गणेश चतुर्थी २०२६ निमित्त कला, संस्कृती, पर्यावरण आणि एकतेचा सुंदर संगम घडवणारा मेगा गणपती इव्हेंट २०२६ आयोजित करण्यात आला आहे.
परंपरा आणि संस्कृती जपत, पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चला एकत्र येऊया आणि आपल्या बाप्पाच्या आगमनाचा उत्साह अधिक खास बनवूया!
या गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजक आणि जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे:
🌿 माटोळी सजावट स्पर्धा
🎭 गणेशोत्सव देखावा स्पर्धा
🎶 गणपती भक्ती गीत स्पर्धा
📖 गणपती स्तोत्र पठण स्पर्धा
📱 आमचा गणपती – रील स्पर्धा
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा महत्त्वाचा उत्सव आहे.
यावर्षी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वततेचा संदेश देत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करूया.
“एकत्र येऊया, प्रयत्न करूया,
बाप्पांचे स्वागत पर्यावरणपूरक पद्धतीने करूया!”
आपली कला, संस्कृती आणि सर्जनशीलता सादर करण्याची ही सुंदर संधी आहे.
आपणही या मेगा गणपती इव्हेंट २०२६ मध्ये सहभागी व्हा आणि गणेशोत्सवाचा आनंद अधिक उत्साहाने साजरा करा!
गणपती स्पर्धा – माहिती, सूचना व अटी-शर्ती
व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी तुमच्या मोबाईलला रेंज आणि पुरेसा डाटा उपलब्ध असल्याची खात्री करा.
व्हिडिओ अर्धवट अपलोड झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.